दौंडला न्यायालयासाठी सुसज्ज इमारत उभारणार

दौंडला न्यायालयासाठी
सुसज्ज इमारत उभारणार
Published on

दौंड, ता. २१ : दौंड शहरातील प्रस्तावित सत्र न्यायालयासाठी सुसज्ज इमारत उभारली जाणार आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासंबंधी संबंधितांना सूचना देण्यात आलेली आहे. तसेच, शहरातील तालुका क्रीडा संकुलाशेजारी नाट्यगृह प्रस्तावित आहे. शहरातील भीमा नदीकाठाचा विकास आराखडा तयार केला जात असून नदीकाठी रेल्वे दगडी पूल ते भीमनगर दरम्यान रस्ता करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
दौंड शहरात शुक्रवारी ( ता. २०) पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. नगरसेवक योगेश प्रेमसुख कटारिया या वेळी उपस्थित होते. राहुल कुल म्हणाले, ‘‘राज्य शासनाकडून सतत पाठपुरावा करून दौंड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय कार्यान्वित करण्यात आले आहे. सध्याच्या न्याय मंदिरातील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयातच प्रस्तावित सत्र न्यायालयाची इमारत उभारली जाणार आहे. खालच्या मजल्यावर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय व त्यावरील मजल्यावर सत्र न्यायालय इमारतीचे बांधकाम प्रस्तावित आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘प्रांताधिकारी कार्यालय इमारत, पोलिस ठाणे व पोलिस उपअधीक्षक कार्यालय बांधकामाचा आढावा घेतला जात आहे. मागील साडेआठ वर्षांचा विचार केला तर दौंड नगरपालिका प्रशासनाकडून समाधानकारक पद्धतीने कामे होत नाहीत. राज्य शासनाकडून विधानसभा सदस्य म्हणून नगरपालिकेला उपलब्ध करून दिलेला निधी विकासकामांकरिता वापरता आलेला नाही व परिणामी काही निधी परत गेला. नगरपालिका सक्षम नसल्याने त्यांच्या हद्दीतील विविध कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली आहेत. नगरपालिकेने सक्षमता दाखविली तर त्यांच्याकडे कामे दिली जातील.’’
दरम्यान, दौंड शहरातील भीमा नदीकाठाजवळ उपजिल्हा रूग्णालयाचे बांधकाम विविध कारणांमुळे रखडल्याने आणि साडेचार एकर जागेतील प्रस्तावित बुध्द विहाराचे काम देखील रखडल्याने त्या कामांची राहुल कुल यांनी पाहणी केली. दौंड एसटी आगार पुनर्बांधणीकरिता सात कोटी रुपये मंजूर झाल्याने त्यासंबंधी कामांची कुल यांनी पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com