दौंडमधील अतिक्रमणांवर पडणार हातोडा

दौंडमधील अतिक्रमणांवर पडणार हातोडा

Published on

दौंड, ता. २८ : दौंड शहरात अतिक्रमण विरोधी कारवाई होणार आहे; परंतु काही जणांना पर्यायी जागा देण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी दिली.
नगरपालिका सभागृहात शुक्रवारी (ता. २७ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सदस्यांच्या सूचना आणि प्रश्नांवर बोलताना नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी ही माहिती दिली. उपनगराध्यक्षा छाया थोरात, मुख्याधिकारी अवधूत तावडे व पालिकेचे सदस्य या वेळी उपस्थित होते. दुर्गादेवी जगदाळे म्हणाल्या, एप्रिल महिन्यात नगरपालिकेने भाडेतत्त्वाने दिलेल्या गाळ्यांचा ई - लिलाव होणार आहे. शहरातील भटके कुत्र्यांची नसबंदी केली जात आहे. मोकाट जनावरांना पकडण्याविषयी उपाययोजना सुरू आहेत. स्थायी समिती सदस्य इंद्रजित जगदाळे यांनी सुसज्ज वाचनालय सुरू करण्याची मागणी केली. विविध भागात हातगाड्यांवर पदार्थ विकले जात असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने एकाच ठिकाणी खाऊ गल्ली सुरू करण्याची त्यंनी मागणी केली. स्वाती सावंत यांनी शहराचा वाढता विस्तार आणि नागरीकरणााचा विचार करून दौंड - गोपाळवाडी रस्ता भागात स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित असल्याने तेथे स्मशानभूमी उभारण्याची मागणी केली. नगरपालिकेच्या थकीत कराची रक्कम, प्रत्यक्षात वसूल झालेल्या रकमेची माहिती आणि वसुली न करण्यामागील कारणांची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली. जीवराज पवार यांनी शहराचा विकास आवश्यक आहे परंतु त्यासोबत नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे सांगत मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. अर्थसंकल्पात कुत्र्यांची नसबंदी व मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताकरिता केलेली ६ लाख ६० हजार रुपयांची तरतूद अत्यल्प असल्याचे सांगत त्यामध्ये वाढ करण्याची मागणी केली. त्याचबरोबर अतिक्रमणे हटविण्याची मागणी करीत नगरपालिकेच्या गाळ्यांचे फेरलिलाव करण्याची मागणी केली.

फुगवटा नाही
स्थायी समिती सदस्यांच्या मागणीप्रमाणे अर्थसंकल्पात विविध तरतुदींमध्ये वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात प्रत्यक्ष आकडे असून कोणताही फुगवटा नाही. पदाधिकारी व सभागृहाच्या मागणीप्रमाणे आवश्यक तेथे तरतूद केली जाईल, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com