दौंड रेल्वे स्थानकावरून
दोन मोबाईलची चोरी

दौंड रेल्वे स्थानकावरून दोन मोबाईलची चोरी

Published on

दौंड, ता. ४ : पुणे- दौंड डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (डीइएमयू) गाडीत व दौंड रेल्वे स्थानकावरून एकूण दोन मोबाईल चोरीस गेले.
सोमवारी (ता. २) दुपारी साहिल रवींद्र थोरात (रा. नानगाव, ता. दौंड) हा युवक केडगाव रेल्वे स्थानकावरून दौंडकडे डीइएमयूमधून प्रवास करीत होता. प्रवासात अज्ञाताने त्याच्या खिशातील साडेबारा हजार रुपये मूल्य असलेला मोबाईल संच चोरून नेला आहे. दुसरी चोरी दौंड रेल्वे स्थानकावर झाली आहे. प्रेमसिंग आगापीत नायक (वय ३८, रा. सानाखोनी, जि. गजपती, ओडिशा) हे सोमवारी (ता. २) ओडिशाकडे जाणाऱ्या प्रवासी गाडीकरिता दौंड स्थानकावर आले होते. फलाट क्रमांक तीनवर ते दुपारी झोपले असता चोरट्याने त्यांच्या खिशातील १३ हजार रुपये मूल्य असलेला मोबाईल संच चोरून नेला. दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोन स्वतंत्र फिर्यादीनुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड रेल्वे स्थानक व स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यांवर संशयित व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या टोळीचा वावर आहे. सर्व सहा फलाटांवर व दोन्ही पादचारी पुलांवर वावरणाऱ्या या टोळीवर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) कोणतीच कारवाई करीत नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे देखील मोबाईल संच व बॅगा चोरीला गेल्या आहेत. स्थानकावर आधी अहोरात्र गस्त घातली जात होती, परंतु आता सोईने गस्त घातली जात असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com