

दौंड, ता. ११ : दौंड नगरपालिकेने आयोजित केलेल्या ‘सन्मान स्त्री शक्तीचा- होम मिनिस्टर’ स्पर्धेत वर्षा जगताप यांनी पहिला क्रमांक पटकावला. शहरात विविध उपक्रमांनी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील राजधानी हॅाटेल जवळील पटांगणात नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि खाद्य महोत्सवाचे आयोजन केले होते. ७ ते १० मार्च या कालावधीत पार पडलेल्या या प्रदर्शन व खाद्य महोत्सवाचे नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष छाया थोरात, मुख्याधिकारी अवधूत तावडे व पदाधिकारी उपस्थित होते.
सन्मान स्त्री शक्तीचा- होम मिनिस्टर ही स्पर्धा प्रा. दिनेश पवार यांनी घेतली व त्यामध्ये ७८ महिलांनी सहभाग घेतला. स्पर्धेत वर्षा अमोल जगताप, वर्षा गणेश ठाकूर व सरिता गौरव कुल यांनी गुणानुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले, तर लकी ड्रॉमध्ये स्नेहल वाठारकर व ज्योती मोकळ यांना भेट स्वरूपात साडी मिळाली. यावेळी माजी नगराध्यक्षा शीतल कटारिया उपस्थित होत्या.
महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमधील योगदानासाठी प्रा. डॉ. संजीवनी शिरगुप्पे, डॉ. प्रतिभा भंगाळे, डॉ. अनुराधा वाळके, डॉ. शलाका लोणकर, डॉ. मिनल वागसकर, ॲड. जयश्री कामत, ॲड. अरुणा डहाळे, सुशिला बाबूराव स्वामी, शैलजा सरनोत, शैला जगताप, उल्का कांबळे, ज्योती रायकर, सुरैया बेगम युसुफ, ठामा खोमणे, आशा खोमणे यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे, उपनगराध्यक्ष छाया थोरात, नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती नमिरा सय्यद, ज्योती राऊत, स्वाती सावंत, रूचिता कटारिया, रेणूका थोरात, प्रणिता शिंदे आदींनी कार्यक्रमांचे संयोजन केले होते.
04525
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.