केडगाव उपबाजारात गहू २८११ रुपये क्विंटल

केडगाव उपबाजारात गहू २८११ रुपये क्विंटल

Published on

दौंड, ता. १८ : केडगाव (ता. दौंड) उपबाजारात गव्हाची आवक व बाजारभावात वाढ झाली आहे. केडगावमध्ये गव्हाची ९७४ क्विंटल आवक झाली असून, त्यास किमान २२५०, तर कमाल २८११ रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव व पाटस येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहे. यवत येथील उपबाजारात भुसार मालाची घटली असून, बाजारभाव स्थिर आहे.
दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली असून, दर स्थिर आहेत. कोथिंबिरीला शेकडा २०० ते ७०० रुपये, मेथीला २०० ते ८०० रुपये, तर शेपूला २०० ते ६०० रुपये भाव मिळाला. कांदापातीला ३०० ते ५०० रुपये दर मिळाला असून, द्राक्षांची २४ क्विंटल आवक होऊन प्रति १० किलोला २०० ते ५६० रुपये भाव मिळाला आहे.

एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू १३३९ २००० २८११
ज्वारी २६८ २००० ५२५०
बाजरी २१४ २००० ३२७०
हरभरा १६२ ४६०० ५०५०
उडीद ८ ५००० ६६७०
तूर ९४ ५६०० ७०५०
मका ७९ १४५० १८१०

प्रति १० किलोसाठीचे कमाल दर :
बटाटा- १४०, लसूण ८२०, आले - ५५०, गाजर- २५०, काकडी- १७०, भोपळा- १५०, कोबी- १०० , फ्लॉवर- १५०, टोमॅटो- २००, हिरवी मिरची- १०००, भेंडी- ५५०, कार्ली- ५५०, दोडका- ३००, वांगी- ३००, शिमला मिरची- ४००, वटाणा- ४००, गवार- १३००, घेवडा- ३००, बिट - १००, शेवगा - ४००, चिक्कू - २५०, लिंबू - १२००, पेरू-१५०, कलिंगड - १५०, खरबूज - २५०, द्राक्ष - ५६०.

कांद्याच्या दरात घट
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली आहे. मात्र, बाजारभावात प्रतिक्विंटल २०० रुपयांची घट झाली आहे. कांद्याची १६ हजार ४७५ क्विटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २००, तर कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला.

लिंबाच्या दरात वाढ
उन्हाचा कडाका वाढल्याने लिंबाला मागणी वाढली असली तरी आवक कमी असल्याने बाजारभाव कडाडले आहेत. केडगाव उपबाजारात लिंबाची ४३ डाग आवक झाली व त्यास प्रतवारीनुसार किमान ११००, तर कमाल २५०० रुपये बाजारभाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com