जिल्हा परिषद अध्यक्षांनी टाळला जल्लोषाचा गुलाल
दौंड, ता. २० : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतरही वीरधवल जगदाळे यांनी अंगावर गुलाल घेतला नाही. खडकी- देऊळगाव राजे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही दिवंगत अजित पवार यांना आदरांजली म्हणून जगदाळे यांनी तेव्हाही गुलाल घेतला नव्हता.
जगदाळे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज व माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना त्यांनी पुष्पहार करून अभिवादन केले. तसेच, जिल्हा परिषदेच्या विशेष सभेनंतर त्यांनी दौंड येथे न जाता थेट बारामती गाठली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केले. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली तरी आपल्या नेत्यास आदरांजली म्हणून त्यांनी गुलाल अंगावर घेतला नाही. त्यानंतर दौंड येथे दाखल झाल्यावर त्यांनी मिरवणूक न काढता पायी जात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रस्त्यात भेटलेल्या नागरिक व मतदारांचे त्यांनी अभिनंदन स्वीकारले.
दरम्यान, गुरुवारी (ता. १९) सालाबादप्रमाणे वीरधवल जगदाळे हे दौंड शहरातील श्री विठ्ठल, राही व रुक्मिणी मंदिरात दौंड शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकारिणी निवडीच्या बैठकीस उपस्थित राहिले. तसेच, दिवसभर साधेपणाने शुभेच्छांचा स्वीकार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

