

दौंड, ता. ३१ : दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुंडांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव वर्षभरापासून रखडल्याने तालुक्यातील गुन्हेगारी फोफावली आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे समाजकंटक राजरोसपणे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
तालुक्यात शांतता राखण्यासाठी सराईत गुन्हेगार व टोळ्यांना ठराविक मुदतीसाठी हद्दपार करणे आवश्यक असते. मात्र, दौंडमध्ये या प्रक्रियेला खीळ बसली आहे. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अनेक प्रस्ताव दाखल असतानाही प्रशासनाने त्यावर वेळेत निर्णय घेतला नाही. निवडणुका पार पडल्यानंतर आता कुठे संथ गतीने ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
तालुक्यात गोहत्या, अवैध वाळू उपसा, मटका जुगार, गांजा विक्री आणि बनावट मद्य निर्मिती करणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे. मागील आठवड्यात गोहत्येप्रकरणी चौघांवर हद्दपारीची कारवाई झाली असली, तरी पोलिसांच्या कारवाईत सातत्य नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या या सोईस्कर भूमिकेमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरला नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
हद्दपारीचे प्रस्ताव दाखल असून, लवकरच त्यास मंजुरी मिळेल. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) देखील टोळ्यांवर कारवाई प्रस्तावित आहे.
- गोपाळ पवार, पोलिस निरीक्षक, दौंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.