

दौंड , ता. १ : केडगाव उपबाजारात गव्हाची १७०९ क्विंटल आवक झाली आहे. तालुक्यात गव्हाची एकूण २७०१ क्विंटल आवक झाली असून त्यास किमान २१०० तर कमाल २८२० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात व केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. पाटस उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. तर यवत येथील उपबाजारात भुसार मालाची घटली असून बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची १२८०७ क्विटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० तर कमाल १२०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक किमान कमाल
( क्विंटल) (रु.) (रु.)
गहू २७०१ २१०० २८२०
ज्वारी ०१९० २५०० ५३१०
बाजरी ०२५० २१०० ३३४०
हरभरा ०२८७ ४८०० ५१५०
तूर ००११ ५५०० ७१८०
उडीद ०००९ ५३०० ६७००
मका ००५७ १६०० १८५०
-----
बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर ) : बटाटा-१४०, लसून-६००, आले-५०० , गाजर-२५०, पेरू-१५०, काकडी-१५०, भोपळा-५०, कोबी-६०, फ्लॅावर-२००, टोमॅटो-२२५, हिरवी मिरची-६५०, भेंडी-४१०, कार्ली-३५०, दोडका - २५०, वांगी - ३००, लिंबू-१५००, कलिंगड - १५०, खरबूज -२३०, द्राक्ष-७००.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.