शेतकरी मारहाणप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

शेतकरी मारहाणप्रकरणी 
परस्परविरोधी तक्रारी
Published on

दौंड, ता. १४ : दौंड- लिंगाळी (ता. दौंड) रस्त्यावर शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घालून मारहाण केल्याप्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विकास अधिकारी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, भीमराव विठोबा पांढरे (वय ४२, रा. मलठण, ता. दौंड) यांनी जिल्हा बॅंकेच्या मलठण शाखेत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्जासाठी अर्ज केला होता. कर्जासाठी दिलेले काही कागदपत्रे बॅंकेचे विकास अधिकारी अक्षय पांडुरंग आटोळे (वय ३०, रा. रावणगाव, ता. दौंड) यांनी मागणी करूनही परत न दिल्याने पांढरे यांनी बॅंकेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीचा राग मनात धरून ८ एप्रिल रोजी दौंड- लिंगाळी रस्त्यावर ग्रामपंचायत कार्यालयासमोर अक्षय शितोळे यांनी दुचाकीवरील पांढरे यांना अडवून त्यांच्या डोक्यात दगड मारत शिवीगाळ केली होती. दरम्यान, या प्रकरणात आटोळे यांनीदेखील परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. कर्जासाठी कागदपत्रे अपुरी असल्याचे लेखी कळविल्याने पांढरे यांनी बॅंकेत येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर लिंगाळी रस्त्यावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com