

दौंड, ता. १५ : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रक्तदान, अन्नदान आणि विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवारी (ता. १४) मध्यरात्री डॉ. आंबेडकर चौकात पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून त्रिशरण पंचशील पठणाने उत्सवाचा प्रारंभ झाला.
या मुख्य सोहळ्याला पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार राहुल कुल, नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे, माजी आमदार रमेश थोरात आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. जयंतीनिमित्त शहरात सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आंबेडकर) वतीने आयोजित शिबिरात ४२ जणांनी रक्तदान केले. याचे संयोजन जिल्हाध्यक्ष सचिन खरात यांनी केले.
रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर प्रतिमेचे पूजन करून अन्नदान करण्यात आले. यावेळी रेल्वे कर्मचारी बी. एस. जमदाडे, एन. बी. वाघमारे यांच्यासह रनिंग स्टाफ उपस्थित होता. महाबोधी प्रबोधन मंच आणि स्वाभिमान महिला भीम ग्रुपच्या लेझीम पथकाने व महामानवांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेली विद्युत रोषणाई आणि भीमगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण चैतन्यमय झाले होते.
04576
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.