डोर्लेवाडीत रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोर्लेवाडीत रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम
डोर्लेवाडीत रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम

डोर्लेवाडीत रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम

sakal_logo
By

डोर्लेवाडीत रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम
डोर्लेवाडी, ता. १८ : राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे उत्साहात पार पडला. बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना ‘राष्ट्र नायिका, गण नायिका जिजाऊ- सावित्रीमाई जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले, तर महिलांच्या रंगलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात रूपाली दत्तात्रेय नाळे यांनी मानाची प्रथम क्रमांकाची पैठणी पटकावली.

येथील राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने संयुक्त जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पौर्णिमा जगताप, अनघा जगताप, अश्विनी सातव, स्मिता देशमुख, डोर्लेवाडीच्या माजी सरपंच सुमन गवळी, कल्याणी काळकुटे, माजी सदस्या पार्वती नाळे, राष्ट्रवादी युवती तालुका उपाध्यक्षा रोहिणी आटोळे, आशाताई काळकुटे आदी उपस्थित होते.

यावेळी बचत गटातील महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या समूह संसाधन व्यक्ती विजया गायकवाड, दीपाली दळवी, पल्लवी बोराटे, वैद्यकीय क्षेत्रात पदवी मिळविलेल्या संपदा हिंदुळे व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल विद्या मोरे यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर तीन तास रंगलेल्या ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात रूपाली नाळ, स्वाती कदम, अर्चना भोपळे, सविता कुंभार व विद्या गाडे यांनी पैठणीचा मान मिळविला. विजयी व सहभागी शंभरहून अधिक महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.


रणजित मोरे, बापूराव गवळी, विजयसिंह घोरपडे, रामभाऊ कालगावकर, कांतिलाल काळकुटे, अजित वामन, अविनाश काळकुटे, यशोदीप नाळे, अतुल भोपळे, मिलिंद घोरपडे, दिलीप चौधरी, विनोद नवले, संदीप मोरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. ज्योती भोपळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्वाती बालटे यांनी होममिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मनोज नाळे यांनी आभार मानले.

----
डोर्लेवाडी (ता. बारामती) : राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात विजयी महिलांना पारितोषिक वितरण करताना मान्यवर.