अजितदादा...‘आमचा विठ्ठल’
पंढरीच्या वारीला निघालेला वारकरी जसा विठ्ठल भेटीसाठी आतुरलेला असतो; आणि पंढरीचा पांडुरंगही आपल्या भक्तांसाठी विटेवर तिष्ठत उभा असतो. तसाच आम्हा कार्यकर्त्यांसाठी आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी, त्यांच्या अडी-अडचणी सोडवणारा, त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारा देवगिरी असो, की बारामतीमधील पहाटे सहा वाजल्यापासून जनसेवेसाठी तत्पर असलेला ‘आमचा विठ्ठल’ म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार.
श्री अजितदादा पवार हे नाव अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ठाम, स्पष्टवक्तेपणा, तत्पर निर्णयक्षमता, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, विकासपुरुष आणि तब्बल ५ वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अर्थमंत्री म्हणून राज्याला विकासासाठी सर्वोत्तम निधी देणारे कार्यतत्पर असणारे व्यक्तिमत्त्व. अशा आदरणीय अजितदादा पवार यांना ता.. २२ जुलै म्हणजे आजच्या दिवशी जन्मदिनानिमित्त माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याकडून व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ असणारे नेतृत्व, लाडकी बहीण योजनेनंतर तमाम माता भगिनींसाठी लाखाच्या फरकाने निवडून येणारा एकच दादा, त्याच्या कार्याचा ठसा याही निवडणुकीत सिद्ध झाला. बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या विकास पुरुषाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या रूपात पाहतो आहे. विकासाचा हा झंझावात आपल्या कार्यातून निर्माण करणारे आदरणीय दादांचे जनतेशी घट्ट नाते आहे. सर्वसामान्यांच्या अडचणींची जाण आणि कोणताही प्रश्न तातडीने एका फोनवर सोडवणारा आणि काम होत असेल तर हो म्हणणारा व नसेल होत तर स्पष्टपणे नाही होणार म्हणून सांगणारा एकमेव नेता म्हणजे अजितदादा.
बारामती हे नाव जगाच्या पाठीवर विकासाचे मॉडेल म्हणून उभे करण्यात अजितदादांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक विकासकाम करताना दूरदृष्टीपणा ठेवून त्याचे योग्य नियोजन करणे हे अजित दादांचे वैशिष्ट्य आहे. तसेच, काम सुरू होण्यापासून ते काम सुरू आणि ते पूर्णत्वास जाऊन तो त्याचा प्रत्येक क्षणाचा प्रत्यक्ष कामाठिकाणी जाऊन आढावा घेऊन ते दर्जेदार कसे होईल, हे पाहणारा आणि काम योग्य झाले नाही तर ते तोडून पुन्हा नव्याने करावयास लावणारा एकमेव नेता म्हणजे अजित दादा होय. त्यामुळे आज बारामती शहरात भव्य उद्योगनगरी, प्रशस्त महिला हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, आंतरराष्ट्रीय विमानतळ, आधुनिक बसस्थानक, न्यायालय, प्रशासकीय भवन, नदी परिसर सुशोभीकरण, कालवा परिसर सुशोभीकरण, भिगवण रोड सुशोभीकरण, जुन्या कचेरीचे सुशोभीकरण, बाबुजी नाईक वाडा सुशोभीकरण, रस्त्यांच्या दुतर्फा लावलेली झाडे या शहरातील विकासकामांबरोबरच बारामती तालुक्यातील प्रत्येक गावांत मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी वितरित केल्याने अख्खा बारामती तालुका सुजलाम्, सुफलाम् करण्यात आमच्या अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. जनतेच्या या विकासासाठी स्वतः पहाटेपासून झटणारा नेता अवघ्या महाराष्ट्राने पाहिला आहे.
विकास आणि विकासाचे राजकारण या मुद्द्यांवर अजितदादांनी विधानसभा गाजवली. राजकारणाची परिस्थिती त्रिशंकू झालेली असताना एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रिपद, अर्थमंत्रिपद सांभाळून राज्यात सभांचा धुरळा उडत असताना आपल्या तालुक्यालादेखील वेळ देण्यात अजितदादा कधीच चुकले नाहीत. प्रत्यक्ष हजर राहून कामे तर केलीच तसेच राज्यात व्यस्त असताना जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांचेवर जबाबदारी सोपवून ‘जनता दरबार’च्या माध्यमातून जनतेची कामे करण्यात कधीही खंड पडू दिला नाही. मुंबई व बारामतीमध्ये असताना सर्वसामान्य जनतेला
आमच्या ‘विठ्ठला’ची अपॉइंटमेंट घ्यायची कधीच गरज भासली नाही. याउलट एखादा बारामतीचा कार्यकर्ता कामाच्या निमित्ताने मुंबईला भेटायला गेल्यास त्याला ‘येथे का आला, मी बारामतीत भेटत नाही का तुला, जास्त पैसे झाले आहेत का’ म्हणून आदरयुक्त दम देणारा अजितदादा ही अनेकांनी पाहिले आहेत.
काटेवाडी ते मुंबई हा प्रवास अजितदादांच्या मुलाखतीत नेहमीच विचारला जातो. त्याचे ज्या-ज्या वेळी उत्तर देतात, त्यावेळी ते कार्यकर्त्यांचा आणि मतदार जनतेचा आवर्जून उल्लेख करतात. ‘त्यांच्याच जिवावर मी राजकारणात मोठा झालो’, हेदेखील वारंवार सांगतात. एखादी गोष्ट चुकली तर ती नम्रपणे मान्य करायलाही अजितदादा कधी चुकले नाहीत. एखाद्या विषयास कितीही विरोध झाला तरी कठोर निर्णय घेणारे अजितदादा अनेकांनी पाहिले आहेत. एखाद्या घटनेत कुणावर अन्याय झाला, दु:खाचा डोंगर कोसळला त्याचवेळी हळवे झालेले.. डोळ्यांच्या कडा ओलावलेले अजितदादाही मी अनुभवले आहेत.
लेखन : सौ. रोहिणी हरिभाऊ आटोळे-खरसे
उपाध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, बारामती तालुका
---------------------
जनता, कार्यकर्त्यांची काळजी घेणारे नेतृत्व
राजकारण करत असताना आपला कार्यकर्ताही मोठा झाला पाहिजे. त्याने उद्योग व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, हे अजितदादा कटाक्षाने पाहतात. त्यांना बळ देण्याचे काम नेहमी करतात. असेच एका निवडणूक प्रचारानिमित्त डोर्लेवाडीला आले असताना मी जरा घाबरतच अजितदादांना दुकानात भेट देण्याची विनंती केली. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी दुकानास भेट दिली. व्यवसायाचा अनुभव आहे का.. दुकान कोण सांभाळत.. माल कुठून आणला जातो.. किती भांडवल गुंतवावे लागले.. किती कामगार आहेत... नफा किती मिळतो आदी सर्व दुकानाची माहिती घेतली. तसेच, कशा पद्धतीने काटकसर करून व्यवसाय केला पाहिजे, हा मोलाचा सल्लादेखील त्यांनी दिला. त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा तर मिळालीच परंतु त्यांच्या सल्ल्यामुळे व्यवसायात वाढदेखील झाली याचे मूर्तिमंत उदाहरण मला मिळाले. अशा आमच्या दादांना जनतेची सेवा करण्यासाठी उदंड आयुष्य मिळो आणि राज्याने त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होवो, हीच पंढरीच्या पांडुरंगा चरणी मनापासून प्रार्थना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.