देऊळगाव राजे- पेडगाव रस्ता दुरुस्त करा

देऊळगाव राजे- पेडगाव रस्ता दुरुस्त करा
Published on

देऊळगाव राजे, ता. ४ : देऊळगाव राजे- पेडगाव (ता. दौंड) या मुख्य पाच किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याशेजारील पाझरपड जमिनीमुळे यातील दोन किलोमीटरचा रस्ता खचत आहे. यामुळे रस्त्याची दुरुस्ती करून काही ठिकाणी सिमेंट रस्ता करण्याची मागणी पेडगाव व देऊळगाव राजे ग्रामस्थांनी केली आहे.
दौंड- सिद्धटेक रस्त्यापासून देऊळगाव राजे गावठाणातून साखरी पुनर्वसन मार्ग हा रस्ता पेडगावला जातो. देऊळगाव राजे ते पेडगाव हे सहा किलोमीटर अंतर आहे. यातील पेडगाव गावाकडील एक ते दीड किलोमीटरच्या रस्त्यांचे काम झाले आहे. परंतु देऊळगाव ते साखरी पुनर्वसन पर्यतचे काम रखडले आहे. यातील देऊळगाव पेडगाव शिवेपासून चालू होणाऱ्या रस्त्याशेजारी पाझरपड शेतजमिनीमुळे रस्ता खचत आहे. सध्या रस्त्याच्या कडेने काटेरी झुडपे वाढली आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल साखरी पुनर्वसन, पेडगाव ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून ११ वर्षापूर्वी या रस्त्याचे काम झाले होते. दोन वर्षापूर्वी त्यातील काही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. परंतु तीही पूर्णपणे दुरुस्ती केली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पेडगाव मुख्य रस्त्यामधील काही रस्ता पाझरपड जमिनीमुळे खचत आहे. रस्त्याची दुरुस्ती करूनही रस्ता टिकलेला नाही. रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करून देऊळगाव- पेडगाव शिव ते साखरी पुनर्वसन पर्यंत सिमेंट रस्ता करावा.
- नामदेव दबडे, माजी उपसरपंच पेडगाव.

देऊळगाव राजे ते पेडगाव या मुख्य रस्त्याच्या कामाला अर्थसंकल्प २०२४ मधून मंजुरी मिळाली आहे. यामुळे लवकरच या कामाला सुरवात होईल.
-शशिकांत तुपे, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, दौंड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com