कलिंगडाच्या बाजारभावात घसरण

कलिंगडाच्या बाजारभावात घसरण

Published on

देऊळगाव राजे, ता. १४ : कडक उन्हामुळे दौंड तालुक्यातील शेतकरी कलिंगडाची विक्री सध्या करीत आहेत. परंतु उन्हाळा व रमजानचा महिना असूनही कलिंगडाला विविध बाजार समित्यांमध्ये प्रतिकिलो सात ते १२ रुपये बाजारभाव मिळत आहे. बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे उत्पादनाच्या खर्चही निघणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दौंड तालुक्यात व पूर्व भागातील बोरीबेल, राजेगाव, वाटलुज परिसरातील शेतकऱ्यांनी डिसेंबर २०२४ मध्ये कलिंगडाची लागवड केली होती. हे पीक ६५ ते ७० दिवसात तोडणीला येते. यंदा तालुक्यासह इतर ठिकाणी कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. यामुळे बाजारात आवक वाढलेली आहे. उन्हाळा व रमजान सुरू असूनही भावात मात्र घसरण झाली आहे.

उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले
मागील वर्षी रमजानच्या महिन्यामध्ये पंधरा ते अठरा रुपयापर्यंत कलिगडाला बाजारभाव मिळाला होता. एक एकर कलिंगड पीक तयार करेपर्यंत शेतकऱ्यांना सुमारे साठ हजारापर्यंत खर्च येत आहे. सध्या बाजारभावात घसरण झाल्याने उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे पुढील पिके घ्यावीत तरी कशी? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसह राजेगाव येथील जयवंत पवार यांनी विचारला आहे.

सध्या बाजार समित्यांमध्ये कलिंगडाची आवक मोठया प्रमाणात येत असल्याने बाजारभाव घसरले आहेत. यामुळे केलेला खर्चही वसुल होत नाही. कलिंगडाला किमान १४ ते १७ रुपये भाव मिळावा.
-कल्याण शेंडगे, कलिंगड उत्पादक शेतकरी, वाटलुज

00438

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com