उन्हाच्या झळांचा कादा पिकास चटका

उन्हाच्या झळांचा कादा पिकास चटका

Published on

देऊळगाव राजे, ता.२५ : दौंड तालुक्यात वाढत्या तापमानाचा फटका कांदा पिकाला बसला आहे. यामुळे उशिरा लागवड झालेल्या कांद्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.कांदा पाती करपू लागल्याने देऊळगाव राजे परिसरातील शेतकरी चिंतातूर बनला आहे.
तालुक्यासह जिल्ह्यातील चालूवर्षी कांद्याच्या लागवडीत वाढ झाली आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्याची सुरवातीच्या कांदा रोपवाटिका वाया गेल्या. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पुन्हा रोपवाटिका तयार केल्या. तालुक्यात उन्हाळी आगापी कांद्याच्या लागवडी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये झाल्या. यंदा जानेवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आहेत. जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांनी ऊस तुटून गेलेल्या शेतामध्ये लागवडी केल्या आहेत.
सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची कांद्याची पिके ६५ ते ७० दिवसांची झाली आहेत. परंतु सध्या तापमान ३८ अंशावर गेले आहे. कडक उन्हामुळे कांद्याला लवकर पाणी द्यावे लागत आहे. चालूवर्षी तापमानात वाढ झाल्याने काही दिवस कांदा लवकर काढणीला येत असल्याचे देऊळगाव राजे येथील कांदा उत्पादक शेतकरी वैभव सस्ते यांनी सांगितले.

वाढत्या तापमानामुळे कांद्याच्या पाता लवकर पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटणार आहे. उत्पादन घटूनही काढणीला मात्र शेतकऱ्यांना तेवढाच खर्च येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
- बापूराव ढमे, प्रगतशील कांदा उत्पादक शेतकरी, राजेगाव.

वाढत्या उन्हाचा कांद्यावर परिणाम दिसून उत्पादनात घट येऊ शकते. यासाठी उन्हाळ्यात पाणी देताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. यामुळे शेतकऱ्यांनी कांद्यामध्ये ठिबक सिंचन चा वापर करावा.
- शिवाजी कदम, कृषी सहाय्यक, देऊळगाव राजे

00475

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com