अवकाळीच्या इशाय्रामुळे शेतकय्राची धावाधाव

अवकाळीच्या इशाय्रामुळे शेतकय्राची धावाधाव
Published on

देऊळगाव राजे, ता.३० : हवामान खात्याने एक एप्रिलपासून अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.
तालुक्यात आगापी लावलेल्या उन्हाळी कांद्याची काढणी तर गहू पिकांची मळणी सध्या सुरू आहे. एकीकडे वाढत्या तापमानामुळे पिकावर त्याचा परिणाम होत आहे. भाजीपाला, कांदा ही पिके करपूण जात आहे. यामुळे शेतकरी पिकांना रात्रीच्या वेळी पाणी देताना दिसत आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. पुणे जिल्ह्यासह इतर ठिकाणी एक एप्रिलपासून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे काढणीस आलेला गहू पीक काढण्यासाठी शेतकरी हार्वेस्टर मशिनकडे धाव घेत आहे. वळईत ठेवलेला कांदा वखारीत टाकण्यासाठी मजुरांची शोधाशोध सुरू आहे. वळई झाकण्यासाठी प्लास्टीक कागद शेतकरी खरेदी करताना दिसत आहे. हरभऱ्याची काढणी सुरू आहे.

अचानकपणे अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. सध्या कांदा, हरबरा, गहू पिकांची काढणी सुरू आहे. पंरतु मजूर वेळेवर उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
- रमेश जाधव, शैतकरी, राजेगाव, ता.दौंड


ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या भागात मोठ्या प्रमाणात उशिरा कांद्याची पेरणी केलेली आहे. हा कांदा पोसण्याच्या अवस्थेत आहे. या वातावरणामुळे कांद्याची साईज छोटी राहून उत्पादन कमी येऊ शकते.
- शिवाजी कदम, कृषी सहाय्यक, देऊळगाव राजे
00485

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com