देऊळगाव राजे परिसरातील शेतकऱ्यांची उडाली झोप

देऊळगाव राजे परिसरातील 
शेतकऱ्यांची उडाली झोप
Published on

देऊळगाव राजे, ता. ११ : देऊळगाव राजे (ता. दौंड) येथील भीमा नदीवरील शेतीपंपाना वीजपुरवठा करणाऱ्या एक लाख रुपये किमतीच्या केबलची बुधवारी (ता. ९) रात्री चोरी झाली. चोरट्यांनी केबल जाळून त्यामधील ताब्यांची तार काढली आहे. सातत्याने होत असलेल्या या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
गावापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर भीमा नदीकाठावर शेतीपंप बसविले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागामध्ये सोकावलेले चोरटे दिवसा पाहणी करून रात्रीच्या वेळी केबल व साहित्याची चोरी करत आहेत. चोरटे चोरीचे ठिकाण बदलून चोरी करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चोरीचे सत्र सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. त्यातून त्यांच्यात संतापाची लाट निर्माण झाले आहे.
चोरट्यांनी बुधवारी रात्री केबलची चोरी केली. जवळच ओढ्यामध्ये केबल जळून त्यामधील तांब्याची तार काढली आहे. ताब्यांच्या तारांना सध्या चांगला भाव मिळत असल्याने चोरट्यांनी केबल चोरीचा सपाटाच लावला आहे. सातत्याने चोऱ्या होऊनही दौंड पोलिसांना चोऱ्या रोखण्यात फारसे यश आले नाही. त्यामुळे पोलिसांनी चोऱ्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदी किनारी सातत्याने केबल चोरी होत आहे. त्यामुळे पूर्व भागातील गांवामध्ये पोलिसांची रात्रीची वेळी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

भीमा नदीकाठावरील शेतीपंपाच्या केबलची वर्षभरात दोन वेळा चोरी झाली आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा.
- रामभाऊ आवचर, शेतकरी, देऊळगाव राजे (ता. दौंड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com