

देऊळगाव राजे, ता. २६ : देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे जय हनुमान कबड्डी संघाच्या वतीने स्व. विष्णुपंत कड-देशमुख स्मृती चषकानिमित्त सोमवारी (ता. २८) कबड्डी स्पर्धेचे (६५ किलो वजनी गट) आयोजन केले आहे, अशी माहिती आयोजक तथा राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते मिलिंद कड- देशमुख यांनी दिली.
स्पर्धा देऊळगाव राजे- बोरीबेल रस्त्यावरील काळेवाडी चौफुला येथील मैदानावर होणार आहे. प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपयांचे आहे. अधिक माहितीसाठी संघानी मिलिंद कड- ७७६९०९२५९६, जयदीप गावडे- ९३५९७९६९६१, प्रदीप कदम- ९८५०५१३९३१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.