

देऊळगाव राजे, ता.२३ : दौंड तालुक्यात गेली आठ दिवस झाले वाऱ्यासह ठिकठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांची वाफश्यानंतर ऊस लागवड व खरीप हंगामातील पिकांची पेरणी वेगाने सुरू होणार आहे. यासाठी शेतकरी पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे.
दौंड तालुक्यात गेली आठ दिवस झाले ठिकठिकाणी तालुक्यात वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. यामुळे उशिरा लागवड केलेल्या कांदा उत्पादकांची वाखरीत कांदा टाकण्यासाठी धावपळ उडाली आहे. पावसामुळे आंबा, कडवळ पिकांचे नुकसान होत आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच हलका पाऊस पडत (मुर) आहे. यामुळे शेतामध्ये पाणी साचू लागले आहे.
दरम्यान, काही शेतकऱ्यांनी ऊस, मका व कपाशीची लागवड करण्यासाठी सऱ्या काढल्या आहेत.
शेतकरी सध्या कृषी दुकानांमधून कपाशी, उडीद, मका, सोयाबीन यांचे बियाणे खरेदी करताना दिसत आहे. पुढील आठवड्यात ऊस,कपाशी,मका लागवड तर उडीद, सोयाबीनची पेरणी सुरू होणार आहे. पावसामुळे एकंदरीत शेतीच्या कामांना वेग येणार आहे. शेतकरी आता पाऊस थांबण्याची वाट पाहत आहे.
चालूवर्षी प्रथमच मे महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला आहे. शेतकरी वाफसा झाल्यानंतर कपाशी, ऊस व मका पिकांची लागवड तर उडीद व सोयाबीन पिकांची पेरणी सुरु करणार आहे.
-संजय भोसले, शेतकरी राजेगाव ता.दौंड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.