देऊळगाव राजेमध्ये रंगले कीर्तन

देऊळगाव राजेमध्ये रंगले कीर्तन

Published on

देऊळगाव राजे : सिद्धटेक येथे ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषानी सिद्धिविनायक मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दुपारी गणेश जन्मावेळी दर्शनमंडप ते महाद्वारापर्यंतच्या परिसरात भाविकांची गर्दी बघायला मिळत होती. सकाळी लवकरच सुरू झालेली भाविकांची गर्दी रात्री पालखी सोहळ्यापर्यंत वाढत गेली. मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सायंकाळी पार पडलेल्या पालखी सोहळ्याने गणेशोत्सवाला रंगत आणली.
गणेशोत्सवातील प्रमुख असलेल्या श्री गणेशजन्म सोहळ्याप्रसंगी गणेशजन्माचे कीर्तन श्रीकृष्ण पुरोहित महाराज यांनी सांगितले. मंदिरात गणेश जन्मोत्सव थाटात पार पडला. चतुर्थीच्या दिवशी मंदिरातील नियोजनाचा मान नलगे यांच्याकडे असतो. सायंकाळी पालखी उत्सवाला सुरुवात झाली. गणेशोत्सव झाल्यानंतर मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिरात भजन, मोरया गोसावी रचित पदे गायली गेली.
भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमीदरम्यान येथे सुरू असलेल्या उत्सवकाळात सिद्धिविनायकाची महापूजा झाल्यानंतर ‘श्रीं’ना भरजरी पोशाख, हिरे-रत्नजडित अलंकार परिधान करण्यात आले होते. चांदीची गणेशमूर्ती पालखीमध्ये विराजमान करण्यात आली. इनामदार, देव यांचा मान असल्यामुळे त्यांच्या आगमनानंतर पालखीची पूजा होऊन पालखी मार्गस्थ झाली. प्रदक्षिणा मार्गावरून थोर गणेशभक्त मोरया गोसावीरचित पदांचे गायन करून पालखी सोहळा पुन्हा मंदिरासमोर आल्यानंतर पालखीपुढे टिपऱ्या, फुगड्या आदी विविध प्रकार खेळण्यात आले. पालखीनंतर भिजविलेल्या हरभऱ्याच्या डाळीचा प्रसाद देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com