खोरवडीतील महामार्गवर अपघाताचा धोका

खोरवडीतील महामार्गवर अपघाताचा धोका
Published on

देऊळगाव राजे, ता. २१ : खोरवडी (ता. दौंड) येथील अष्टविनायक महामार्गावर दोन दिवसांपासून रस्त्याच्या मध्यभागी हायड्रोलिक क्रेन बंद पडले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा होत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
बंद पडलेल्या क्रेनला त्वरीत बाजूला करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
अष्टविनायक गणपतींपैकी सिद्धटेक गणपतीला भाविक पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातून दर्शनासाठी येत असल्यामुळे नेहमीच या रस्त्यावर वर्दळ असते. त्यातच दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. शिवाय लग्न सराईमुळे अष्टविनायक महामार्गावर कायमच वाहतूक असते. या महामार्गावर नेहमी अपघात होत असतात. प्रशासनाच्या वतीने कुठलीच उपाय योजना केली जात नाही. केवळ फक्त बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत.
दुचाकी चालक पुढील वाहन ओव्हरटेक करत असताना रस्त्यावरील मधोमध बंद पडलेल्या क्रेनचा पुढील भाग आल्याने समोरच्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. या हायड्रॉलिक क्रेनला रस्त्यावर एका बाजूला केले किंवा शेतातील रस्त्यावर पाठीमागे सरकवले तर वाहतूक सुरळीत होईल, अन्यथा मोठा अपघात घडू शकतो.

सध्या या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. या वाहतुकीस बंद पडलेल्या हायड्रॉलिक क्रेनचा अडथळा निर्माण होत असून, मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन क्रेन बाजूला काढून वाहतूक सुरळीत करावी.
- अनिल गोसावी, सरपंच, खोरवडी

संबंधित हायड्रॉलिक क्रेन बाजूला काढून घेण्याबाबत सूचना देण्यात आली असून, चुकीच्या पद्धतीने क्रेन लावले असेल त्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- गोपाल पवार, पोलिस निरीक्षक, दौंड

00774

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com