अवयवदानातून किरणच्या स्मृती अक्षय

अवयवदानातून किरणच्या स्मृती अक्षय

Published on

दावडी, ता. ९ : खरपुडी बुद्रुक (ता. खेड) येथील किरण आनंदा भोगाडे (वय ४१) यांचे पिंपरी- चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात २ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झाले. या दुःखाच्या प्रसंगातही त्यांच्या कुटुंबीयांनी अतुलनीय सामाजिक संवेदना दाखवत किरण यांच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे काही रुग्णांना नवे जीवन मिळाले.
किरण भोगाडे हे कल्याण येथे किरकोळ भाजीपाल्याचे दुकान चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई-वडील तसेच भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे. घरची आर्थिक परिस्थिती दारिद्र्याची असून, त्यांचे आई-वडील शेती करून उदरनिर्वाह करतात. किरण यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर कोसळलेले दुःख अतोनात आहे. मात्र, तरीही या कुटुंबाने सामाजिक संवेदना दाखवत किरण यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांचे मूत्रपिंड, हृदय, किडनी आणि फुप्फुस अशा अवयवांचे दान केले. त्यामुळे काही रुग्णांना नवे जीवन मिळाले.
तसेच, ज्या वयात आई-वडिलांना मुलाच्या आधाराची सर्वाधिक गरज होती, त्या वेळी किरण यांचे निधन हा कुटुंबासाठी मोठा आघात ठरला. हे दुःख समजून त्यांचे मित्र असलेल्या कै. वसंतराव मारुतराव मांजरे विद्यालयातील २००२-०३ च्या दहावीच्या बॅचमधील मित्रांनी एकत्र येत मानवतेचा मोठा आदर्श घातला. या मित्रमंडळींनी दशक्रिया विधीच्या दिवशी त्यांच्या कुटुंबाला ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन किरणला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
किरण भोगाडे यांच्या अवयव दानातून आणि त्यांच्या मित्रांच्या या उभ्या केलेल्या आधारातून समाजात संवेदनशीलतेचा वेगळीच पाऊलवाट उमटताना दिसत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com