दावडीच्या सरपंचपदी 
राहुल कदम बिनविरोध

दावडीच्या सरपंचपदी राहुल कदम बिनविरोध

Published on

दावडी, ता. १३ : दावडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राहुल कदम तर उपसरपंचपदी संगीता मैंद यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच पदाची निवडणूक (ता. १०) रोजी झाली असून या निवडणुकीत राहुल कदम यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी माणिक गायकवाड यांनी काम पहिले. त्यावेळी तलाठी भाऊसाहेब शिंदे व ग्रामसेवक विद्या लोखंडे उपस्थित होत्या. धनश्री कान्हूरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली.
तसेच उपसरपंच पदाची निवडणूक (ता. १२) रोजी सरपंच राहुल कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीसाठी संगीता मैंद यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे यांची बिनविरोध निवड झाली.
उपसरपंच मेघना ववले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. ग्रामसेवक विद्या लोखंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या प्रसंगी संभाजी घारे, अनिल नेटके, संतोष सातपुते, धनश्री कान्हूरकर, पुष्पा होरे, मेघना ववले, राणी डुंबरे, माधुरी खेसे, दत्तात्रय ओंबळे, दादाभाऊ दुधावडे उपस्थित होते. सरपंच व उपसरपंच यांचा ग्रामस्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Marathi News Esakal
www.esakal.com