कनेसरला सहा जणांवर हाणामारीप्रकरणी गुन्हा

कनेसरला सहा जणांवर हाणामारीप्रकरणी गुन्हा
Published on

दावडी, ता. १९ : कनेरसर (ता.खेड) येथील एमआयडीसी परिसरात जमीन समतलीकरणाच्या कामाच्या वादातून बुधवारी (ता.१८) दुपारी के अँड के कंपनीसमोर जोरदार हाणामारीची घटना घडली. या मारहाणीत शेखर पोपट तांबे (वय २२, रा. वरुडे, ता.खेड) हा तरुण जखमी झाला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती खेड पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सिसोदे साहेब यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, कनेरसर येथील एम.आय.डी.सी क्षेत्रात सुरू असलेल्या जमीन समतलीकरणाच्या कामावरून दोन गटांमध्ये वाद सुरू होता. हा वाद चिघळून त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. त्यात शेखर याला मारहाण झाली असून त्याच्यावर राजगुरुनगर येथील शिवतीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी मनोज मकाळे, सिद्धार्थ झोडगे,कमलेश दौंडकर, संकेत दौंडकर,स्वागत माशेरे, जय चौधरी या सहा जणांसह १० अनोळखी व्यक्तींविरोधात खेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com