खरपुडी खुर्द येथे महाआरती

खरपुडी खुर्द येथे महाआरती

Published on

दावडी, ता. २० : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खरपुडी खुर्द (ता. खेड) येथे गुरुवारी (ता. १९) महाआरती व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता शिवज्योत स्वागताने झाली. सायंकाळी ४ ते ६ भव्य मिरवणूक, शिवप्रतिमेचे पूजन त्यानंतर ७ ते ९ लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
संध्याकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुलांनी शिवचरित्रावर आधारित नाटिका सादर केली. तसेच पोवाडे, लेझीम व देशभक्तिपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्वांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवक मंडळ व खरपुडी खुर्द ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. शेवटी शिवभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com