जऊळकेत मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जऊळकेत मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Published on

दावडी, ता. ५ : जऊळके खुर्द (ता.खेड) येथील कालभैरव मंदिर परिसरात कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शेतकऱ्यांना विविध विषयांसह रेशीम शेतीवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे पुणे जिल्हा परिषद पुणे व कृषी विभाग, पंचायत समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले होते. या प्रसंगी जिल्हा रेशीम अधिकारी विठ्ठल फड तसेच संजय फुले यांनी महा रेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीचे महत्त्व, लागवड पद्धती आणि त्यातील उत्पन्नाच्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली.
राजगुरूनगर, खेड येथील कांदा व लसूण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संकेत मोरे मार्गदर्शन केले. पंचायत समिती खेडचे कृषी अधिकारी विजय खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. शिव प्रसाद वांगस्कर व स्वाती भोईर तसेच सोमनाथ पाराशुर, रूपाली पवळे व अश्विनी भगत या उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com