कनेरसरला ४३५ दाखल्यांचे वितरण

कनेरसरला ४३५ दाखल्यांचे वितरण

Published on

दावडी, ता. ७ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत खेड तालुक्यातील पहिले मंडळस्तरीय शिबिर शुक्रवारी (ता.७) कनेरसर येथील यमाई देवी सभागृहात पार पडले. शासन आपल्या दारी या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.यावेळी ४३५ दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
प्रांत अधिकारी अनिल दौंडे व तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात ई-फेरफार प्रणाली अंतर्गत ७८ फेरफार निर्गत करण्यात आले. तसेच सातबाराचे ३५४ उतारे व ८अचे १७० उतारे नागरिकांना देण्यात आले. कलम १५५ अंतर्गत ३० अर्ज प्राप्त झाले आहेत.
यावेळी १० कुटुंबांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले तर ४० अर्ज प्राप्त झाले. पीएम किसान योजनेअंतर्गत पाच लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. अग्रीस्टॅक योजनेअंतर्गत ११२ नागरिकांची फार्मर आयडीसाठी नोंदणी करण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेचे ६ लाभार्थी मंजूर करण्यात आले.
शिबिरात विद्यार्थ्यांना व नागरिकांना जातीचे २०, डोमासाईल ३६०, उत्पन्नाचे ५० व नॉन-क्रिमिलेअरचे ५ असे एकूण ४३५ दाखले मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच १० लाभार्थ्यांना घरकुलासाठी जमिनीचे पट्टे देण्यात आले. कृषी विभागामार्फत दोन लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, हे शिबिर आमदार बाबाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यांच्या हस्ते विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य विजय शिंदे, दीप्ती भोगाडे, नितीन सूर्यवंशी, चेतन मोरे, राम बिजे, नीलेश घोडके तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली.


00179

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com