

दावडी, ता. ४ : चिंचोशी (ता. खेड) गाव कचरामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगातून व्यावसायिक आणि दुकानदारांना मोठ्या व्हील डस्टबिनचे वाटप केले. सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे गावात कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत होता. यावर उपाय म्हणून सरपंच सचिन भोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल व्यावसायिक, दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांना या डस्टबिनचे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच भोसकर म्हणाले, "केवळ डस्टबिन देऊन गाव स्वच्छ होणार नाही, तर नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून सहकार्य करणे आवश्यक आहे. गाव सुंदर ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे."या कार्यक्रमाला उपसरपंच माया निकम, सदस्य सीमा गोकुळे, अमोल कानडे, सुभाष मोरे, कविता गोकुळे, ग्रामसेवक सारिका गोरडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.