भंडारा-खोबऱ्याच्या उधळणीत खंडोबाची यात्रा

भंडारा-खोबऱ्याच्या उधळणीत खंडोबाची यात्रा
Published on

दावडी, ता. २: खेड तालुक्यातील श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त खंडोबा देवाची पारंपरिक यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडली. पहाटे आरती व अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जयमल्हार’च्या गजरात खोबरं-भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
खंडोबाच्या लग्नाच्या वरातीशी निगडित असलेल्या या यात्रेला राज्यभरातून भाविक उपस्थित होते. दिवसभर नवसाचे गाडे पळाले. यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली होती. सुरक्षेच्या दृष्टीने खेड पोलिस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन केले होते.
तसेच खेड एस.टी. डेपोमार्फत जादा बस सोडण्यात आल्या होत्या, तर पीएमपीनेही अतिरिक्त बसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. दुपारनंतर झालेल्या पावसामुळे काही काळ भाविकांची धावपळ उडाली, मात्र त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरळीत सुरू झाला.
यात्रा यशस्वी होण्यासाठी बाळासाहेब शिंदे, विलास भगत, बबन थोरात, संतोष शिंदे, काळुराम वायकर, नवनाथ तांबे, दत्ता दाभाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.


श्री क्षेत्र निमगाव खंडोबा (ता. खेड) : दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com