

दावडी, ता. ६ : खेड ते निमगाव (ता. खेड) दरम्यानच्या आठ किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, मार्गावर लहान-मोठे सुमारे १०० ते १५० खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
निमगाव, आंबेओहळ, खरपुडी आणि मांजरेवाडी परिसरात खड्ड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यापूर्वी येथे अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. निवडणुकांच्या काळात प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे तात्पुरते काम केले होते, मात्र अल्पावधीतच नव्याने खड्डे पडले असून परिस्थिती पूर्ववत झाली आहे. खंडोबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक आणि स्थानिक नागरिकांना या खड्ड्यांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळावीत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत रस्त्याच्या दुरुस्तीबाबत दिलेली आश्वासने कितपत पूर्ण करतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.