घोडेगाव येथील वाल्हेकर यांच्या ग्रंथाची संदर्भग्रंथ म्हणून निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडेगाव येथील वाल्हेकर यांच्या ग्रंथाची संदर्भग्रंथ म्हणून निवड
घोडेगाव येथील वाल्हेकर यांच्या ग्रंथाची संदर्भग्रंथ म्हणून निवड

घोडेगाव येथील वाल्हेकर यांच्या ग्रंथाची संदर्भग्रंथ म्हणून निवड

sakal_logo
By

घोडेगाव, ता. २१ : येथील बी. डी. काळे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आणि मराठी विभागप्रमुख प्रो.डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर यांचे औरंगाबाद येथील प्रकाशिका उषा मुलाटे व डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या स्वरूप प्रकाशनाने २००९ मध्ये प्रकाशित केलेले ''आदिवासी साहित्य-एक आकलन'' हा समीक्षाग्रंथ मुंबई विद्यापीठातील एम.ए. मराठी भाग दोन सत्र तीनसाठी आदिवासी मराठी साहित्य या अभ्यासपत्रिकेसाठी संदर्भग्रंथ म्हणून निवड झाली आहे.
डॉ. वाल्हेकर यांनी या ग्रंथात आदिवासी साहित्याची संकल्पना, स्वरूप व व्याप्ती, कादंबरीतील आदिवासी जीवन चित्रण, कथेतील आदिवासी जीवनचित्रण, आत्मकथनातून प्रकट होणारे आदिवासी जीवन, काव्यातून प्रकट होणारे आदिवासी जीवन, आदिवासींचा नाट्याविस्कार, आदिवासींचे जीवनचित्रण करणाऱ्या साहित्याचे वाड्मयीन मूल्यमापन इ.घटकांची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. नव्याने एम.फिल.,पीएच. डी. व इतर संशोधनाचे कार्य करणारे अभ्यासकांना हा समीक्षाग्रंथ अतिशय उपयुक्त आणि मोलाचा समीक्षाग्रंथ ठरला आहे. हाच समिक्षाग्रंथ बुकगंगा डॉट कॉमवर ऑनलाइन उपलब्ध आहे. या ग्रंथाच्या आजमितिस २ आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. हा समीक्षाग्रंथ यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथे एम.ए.च्या अभ्यासक्रमात निवडलेला होता.
.,.......................,...
01971