Wed, March 29, 2023

आभा हेल्थ कार्ड शिबिराचा चासला ५० जणांना लाभ
आभा हेल्थ कार्ड शिबिराचा चासला ५० जणांना लाभ
Published on : 12 March 2023, 11:06 am
घोडेगाव, ता. १२ : चास (ता आंबेगाव) येथे कुसुमबेन प्रतिष्ठान नारोडी व भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार यांच्या संयुक्त विद्यमाने आभा हेल्थ कार्ड शिबिराचे आयोजन केले होते. याचा लाभ पन्नासहून अधिक नागरिकांनी घेतला. शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच दिलीप चासकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीकांत चासकर मधुकर बारावी अमित रोकडे रामदास बारवे उपस्थित होते. . अमित रोकडे, ओंकार काळे यांनी व्यवस्था पाहिली. जिल्हा परिषद गटातील चिंचोली, गिरवली, गोलदरा, गोनवडी, घोडेगाव या परिसरातही टप्प्याटप्प्याने हे शिबिर होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. विजय पवार यांनी स्वागत केले.
02090