घोडेगाव येथे आज
व्यवसाय कार्यशाळा

घोडेगाव येथे आज व्यवसाय कार्यशाळा

Published on

घोडेगाव, ता. १६ : राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पूजा गार्डन मंगल कार्यालयात शनिवारी (ता. १७) सी. बी. कोरा ग्रामोद्योग संस्थान खादी व ग्रामोद्योग आयोग सूक्ष्म, लघु उद्योग मंत्रालय भारत सरकार व सुवर्णवेध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांनी दिली.
सकाळी ११ ते २ या वेळेत ही कार्यशाळा पार पडणार आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी भारत सरकारचे अतिरिक्त निजी सचिव संदीप पोखरकर, प्राचार्य एस. एस. तांबे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, देविदास दरेकर, सुवर्णवेध फाउंडेशनच्या अध्यक्ष सुवर्णा देविदास दरेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत महिला बचत गट, नवउद्योजक, व्यवसाय विस्तारीकरण, लघुउद्योग, कुटीर उद्योग, लहान-मोठे व्यावसायिक, शेतकरी, युवक व युवती यांच्यासाठी रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रशिक्षण आदींची माहिती देण्यात येणार आहे. परिसरातील महिला बचत गट, उद्योजक, विद्यार्थी व व्यावसायिक यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com