संस्थांनी स्वतःचा व्यवसाय उभारावा

संस्थांनी स्वतःचा व्यवसाय उभारावा

Published on

घोडेगाव, ता. १७ : ''सभासदांच्या हितासाठी तसेच संस्थेच्या नफ्यात वाढ होण्यासाठी यापुढे प्रत्येक गाव पातळीवरील विविध कार्यकारी संस्थेने स्वतःचा व्यवसाय उभारावा. त्यामुळे संस्था सभासदांना सक्षम करेल,'' असे प्रतिपादन विठ्ठलराव विखे पाटील सहकारी संस्थेचे व्याख्याते डॉ. देवदत्त दिवेकर यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थेच्या सभासद व सचिव व बँक अधिकारी यांचे सहकारी संस्था सभासद जागृती
अभियानप्रसंगी दिवेकर बोलत होते. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी संस्था व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
यावेळी सहायक निबंधक एस.टी, सरसमकर, पुरुषोत्तम नावेलकर, वैभव बोडके, विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड, एल.बी. थोरात, प्रवीण घुले उपस्थित होते.
यावेळी सरसमकर म्हणाले, की तालुक्यातील ५९ संस्थांनी यावर्षात एक तरी नावीन्यपूर्ण व्यवसाय सुरू करावा. केंद्रशासनाने १५१ व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रत्येक गावाचा भौतिक विचार करून संस्थेने पुढाकार घ्यावा. राज्य व केंद्र शासन मदत करण्यास पुढे आहे.
वैभव बोडके म्हणाले, विविध कार्यकारी संस्थेने यामुळे कर्ज बरोबरच गावाच्या गरजा लक्षात घेऊन व्यवसाय उभारावे. व्यवसाय उभारणीसाठी केंद्र, राज्य व बँक कमी व्याज दराने कर्ज देते. यावेळी संस्थेच्या सभासद बाळासाहेब गावडे, विठ्ठल पिंगळे, यांनी आपली मते मांडली आभार विष्णू गायकवाड यांनी मानले.

02300

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.