घोडेगावात गरजू विद्यार्थ्यांना मदत

घोडेगावात गरजू विद्यार्थ्यांना मदत

Published on

घोडेगाव, ता. ९ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील नर्मदे हर परिवाराच्या वतीने परिसरातील ११० गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग तसेच शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील वनमाला मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंचर येथील उद्योजक व शरद बॅंकेचे संचालक अजय घुले म्हणाले, यापूर्वी याच संस्थेने शैक्षणिक क्षेञात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळाली तर पुढे हेच विद्यार्थी विविध पदे भूषवतील व सामाजिक योगदान देतील.
याप्रसंगी आंबेगाव पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे, घोडेगावच्या सरपंच अश्विनी तिटकारे, मायबोली संस्थेच्या हिराबाई काळे, नंदकुमार बोऱ्हाडे, संजय काळे, जयसिंग काळे, श्याम होनराव, राजाभाऊ काळे, पुरुषोत्तम भास्कर, रवींद्र कर्पे, महेश काळे, विलास काळे, हिराबाई बोऱ्हाडे, रोहिदास झोडगे, ग्रामपंचायत सदस्य लखन घोडेकर, अमोल काळे, रूपाली जंबुकर, सारिका घोडेकर, संगीता भागवत आदी उपस्थित होते.
नर्मदे हर परिवाराचे अध्यक्ष विनोद काळे, सदस्य धनंजय काळे, सतीश जाधव, प्रथमेश अकोलकर, अतुल गडकरी, उदय नांगरे, आकाश झुंजुरके, नीलेश बेलापूरकर, गजानन काळे, श्याम काळे, अशोक काळे, महेश बोऱ्हाडे, किरण राऊत, विक्रम तिटकारे यांनी नियोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.