कोटमदरा येथे वसतीगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

कोटमदरा येथे वसतीगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

Published on

घोडेगाव, ता. १४ : कोटमदरा (ता. आंबेगाव) येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहात विशाल दुंदा मावळे (वय १७, रा. पाटण, पो. कुशिरे, ता. आंबेगाव) याने नॉयलॉनदोरीने वसतीगृहातील खोलीत गळफास घेतला. ही घटना बुधवारी (ता. १२) घडली.
विशाल हा घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत शिकत होता, अशी माहिती वसतीगृहाचे गृहपाल विपुल टकले यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात दिली.

दरम्यान, विशाल राहत असलेल्या खोली क्रमांक ए १० चा दरवाजा बंद होता. त्यामुळे टकले यांनी कडी कोयंडा तोडून दरवाजा उघडला. त्यावेळी विशालने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यास त्वरित रुग्णवाहिकेमधून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तो उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मनिषा तुरे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com