

घोडेगाव, ता. २५ : मंचर ते वडगाव काशिंबेग मार्गे नारोडी या एसटीच्या फेऱ्यांच्या अनियमिततेमुळे नारोडी येथील प्रवासी त्रस्त झाले आहेत. विशेषतः अचानक बसच्या फेऱ्या रद्द होत असल्याने शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत आहेत. या सर्व बस नियमित कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी मंचर आगार प्रमुखांकडे केली आहे.
आंबेगाव तालुक्यात मंचर, वडगाव फाटा, वडगाव काशिंबेग, चिंचोली देशपांडे मार्गे नारोडी अशा एसटी बसच्या फेऱ्या नियमित सुरू होत्या. त्याचा फायदा सर्वांनाच होत होता. परंतु काही दिवसांपासून एसटीच्या अनियमिततेमुळे प्रवासी त्रासून गेले आहेत. या बस मधून शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, महिला ,शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ प्रवास करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना एसटी बसच्या अनियमिततेमुळे शाळा, कॉलेज, क्लासला वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठी मंचर आगार प्रमुखांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा अद्यापही एसटी बस सेवा नियमितपणे वेळेत सुरू झालेली नाही. तसेच नारोडी येथील मुक्कामी असलेली एसटी बस देखील बंद झालेली आहे. सकाळी मंचर येथून ७.३० व ९.०० वाजता, दुपारी २.३०, ३.३० व सायंकाळी ६.०० व ६.४५ वाजता नारोडी
मुक्कामीअशा एसटी बसेसच्या फेऱ्या सुरू होत्या. तरी लवकर नियमितपणे एसटी सेवा सुरू व्हावी अशी नारोडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.