सुपेधर येथे दुचाकीस्वार ठार

सुपेधर येथे दुचाकीस्वार ठार

Published on

घोडेगाव, ता. ३ : मंचर- भीमाशंकर रस्त्यावरील सुपेधर (ता. आंबेगाव) येथील एक अवघड वळणार चार चाकी व मोटार सायकल यांची धडक होऊन एक जण ठार, तर दोघे जखमी झाले. यातील अपघातग्रस्त चारचाकी वाहनावरील वाहन चालक फरारी झाला असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी सांगितले.
मंचर येथील जय संजय कांबळे, अभिजित भरत मोरडे व वडगाव काशिंबेग येथील तुषार संतोष भैये हे तिघे २ जुलै रोजी रात्री मोटार सायकलवरून (क्र. एम.एच. १२ एल.आर. ०९०९) श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देवदर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन ३ जुलै रोजी ते परत येत असताना सकाळी ९ च्या सुमारास सुपेधर येथील वळणार आले असता भीमाशंकरकडे जाणारी चार चाकी (क्र. एम.एच. १४ जे.यू. ९६४२) व त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन चालक पळून गेला. संबंधित मोटारसायकलवरील अपघातग्रस्त व्यक्तींना ग्रामीण रूग्णालय घोडेगाव येथे आणले. त्यावेळी डॉक्टरांनी संबंधित व्यक्तींची तपासणी केली असता त्यातील अभिजित भरत मोरडे (वय २२, रा. मंचर) या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर, दोन जखमींना पुढील उपचारासाठी मंचर येथे नेण्यात आले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सरला सुरकुले करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com