आंबेगावात सहकार सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम

आंबेगावात सहकार सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम

Published on

घोडेगाव, ता. ५ : आंबेगाव तालुक्यात सहकार सप्ताहानिमित्त वृक्ष लागवड, विविध कार्यकारी संस्था व शेतकरी यांच्यामार्फत वृक्ष लागवड तसेच विविध कार्यकारी संस्थेच्या सचिवांना ई ऑडिट संदर्भात मार्गदर्शन आदी कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती साहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी दिली.

मंचर (ता. आंबेगाव) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सूर्यवंशी यांनी सचिव व बँक अधिकारी यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले, देशात केंद्रीय स्तरावर सहकार मंत्रालयाची स्थापना होऊन चार वर्षांचा कालावधी लोटलेला आहे. सहकारास एक स्वतंत्र विभाग म्हणून नवी ओळख देऊन सहकार क्षेत्र अधिक वृद्धिंगत करण्यासाठी केंद्रीय पातळीवर स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी ३० जून ते सहा जुलै या काळात महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये सहकार सप्ताहाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

साहाय्यक निबंधक सहकारी संस्था आंबेगाव विठ्ठल सूर्यवंशी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर च्या आवारात रक्तचंदन व बेल वृक्षांची लागवड केलेली आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांना व सहकाराशी संबंधित पदाधिकारी व सभासद यांना ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहित केले.
आंबेगाव तालुक्यातील ५८ शेती विकास संस्थांची त्या कामासाठी निवड झालेली आहे. यापुढे गाव पातळीवरील शेती विकास संस्थांचे लेखापरीक्षण हे ऑनलाइन असणार आहे. त्याची सुरुवात या वर्षापासून होत आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता.४) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मंचर येथील सभागृहात ई ऑडिट संदर्भात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर प्रशिक्षणास साहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी, आंबेगाव तालुक्याचे विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड, जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांचे प्रतिनिधी तालुका लेखापरीक्षा एस टी बोराडे, श्रीमती टी. एम. भवारी, बँकेचे वसुली अधिकारी, विकास अधिकारी, सचिव आणि लेखापरीक्षक हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com