आमोंडी फाटा येथे
एक टन हिरडा जप्त

आमोंडी फाटा येथे एक टन हिरडा जप्त

Published on

घोडेगाव, ता. २८ ः आमोंडी फाटा (ता. आंबेगाव) येथे अनधिकृत हिरड्याची वाहतूक करणाऱ्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी घोडेगाव व वनकर्मचारी यांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये एक टन हिरडा माल जप्त केला. आमोंडी फाटा येथून हिरड्याची विना परवाना वाहतूक करणारा महिंद्रा सुप्रो प्रॉफिट ट्रक (क्र. एमएच १४ १४ जेएल ५११५) जाणार असल्याची माहिती मिळाली असता वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन वाहनाची तपासणी केली. यावेळी एक टन वजनाच्या बाळ हिरड्याच्या २० गोण्या जप्त केल्या. याची अंदाजे बाजारभाव किंमत एक लाख १० हजार रुपये इतकी आहे. शाहरुख अहमद तांबोळी (वय ३०, रा. तळेघर, ता. आंबेगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जुन्नरचे उप वनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Marathi News Esakal
www.esakal.com