शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 
घोडेगाव तहसीलसमोर आंदोलन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घोडेगाव तहसीलसमोर आंदोलन

Published on

घोडेगाव, ता. ८ ः आंबेगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती करावी, पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला करून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी, अतिवृष्टीमुळे घरे, पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना त्वरित मोबदला देण्यात यावा, वीज बिल माफ करावे, तसेच बँकांची वसुली थांबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. नायब तहसीलदार शांताराम कीर्वे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जिल्हा संघटक राजाभाऊ बाणखेले, तालुकाप्रमुख नितीन भालेराव, जिल्हा संघटक रोहन कानडे, हर्षल भालेराव, प्रमोद पिंगळे, स्वप्नील भालेराव, सुभाष भालेराव, विनोद घुले अमित मोरडे, चंद्रकला पिंगळे, शीतल बागल, दत्तात्रेय खानदेशी, संजय थोरात, घोडेगाव शहर प्रमुख नंदकुमार बोराडे, संतोष पंचरास, दीपक वायाळ, संतोष खेत्री, नाजीम मुजावर, सचिन घोलप, भरत भोर, हेमंत एरंडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com