

घोडेगाव, ता. १८ ः घोडेगाव वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड संजय आर्विकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून ॲड दिपक लोहाटे व ॲड माधुरी ढवळे, सचिव म्हणून ॲड अक्षदा ठोंबरे तसेच खजिनदारपदी ॲड संगिता गावडे यांची निवड करण्यात आली.
घोडेगाव वकील संघाची निवडणूक घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. ॲड. संजय आर्विकर व इतर पदाधिकारी यांचा घोडेगाव वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यायालयातील वर्षभरातील सर्व कार्यक्रम तसेच न्यायालय परिसरातील सुशोभीकरण, स्वच्छ पाणी पुरवठा याबरोबरच वकिलांच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन ॲड आर्विकर यांनी यावेळी दिले.
निवडणूक अधिकारी म्हणून ॲड अनिल पोखरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड प्रतीक गोडसे व ॲड सिध्देश टाके यांनी काम पाहिले.