घोडेगावात एकल महिलांचा सन्मान
घोडेगाव, ता. २४ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पंचायत समिती कार्यालयातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. कार्यालयातील सर्व एकल महिलांचा सन्मान म्हणून त्यांना हळदी कुंकू लावण्यात आले. कार्यक्रमात सर्वांना गुलाबाचे रोप वाण म्हणून देण्यात आले.
विधवा महिलांना हळदी कुंकू कार्यक्रमास न बोलावणे ही अत्यंत वाईट प्रथा आहे. सर्व वर्गाने एका व्यासपीठाखाली येऊन कार्यक्रम साजरा करणे आवश्यक असताना फक्त सौभाग्यवती महिलांना निमंत्रण देणे, ही अत्यंत क्लेशदायक प्रथा आहे. समाजातील एकल महिलांना तुमची सहानुभूती नको असते, तर फक्त आदर आणि प्रेमाची आवश्यकता असते. या कार्यक्रमात आजपर्यंत कधीही विधवा, सौभाग्यवती असा भेदभाव न होता सर्व महिला आनंदाने व उत्साहाने एकत्रित येऊन समारंभाचा भाग होतात.
समाजातील एकल महिलांना प्रवाहात आणण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या माध्यमातून चळवळ स्वरूपात प्रयत्न सुरु आहेत. आंबेगाव तालुक्यातील सर्व १०३ ग्रामपंचायतींनी त्यांच्या प्रयत्नास सकारात्मक प्रतिसाद देऊन या अनिष्ट रूढी आणि परंपरा मोडून काढून एकल महिलांना कार्यक्रमात सन्मान द्यावा असे मत गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

