

मंचर, ता. २८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २९) आयोजित आठवडे बाजार रद्द करून कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर गावात आयोजित शोकसभेत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनांत आठवणी दाटून आल्या होत्या.
शोकसभेत बोलताना आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी अजितदादांशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे दोन वेळा अध्यक्ष म्हणून काम करत असताना दादांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे संघाची झालेली भरभराट त्यांनी नमूद केली.
यावेळी वैभव वायाळ, कल्याण शिंदे, शरद शिंदे, प्रवीण टेमकर, मयूर पतसंस्थेचे अध्यक्ष हरिदास रामवत, नीलेश देमकर, धनंजय ढुमणे, राजू भोर, महावितरण कंपनीचे अधिकारी शिंदे, संजय वायाळ आदींनीही श्रद्धांजली अर्पण केली.
शोकसभेचे संयोजन राजीव भोर, संचालक आनंदराव शिंदे, भगवान वाघ, उपसरपंच प्रवीण भोर यांनी केले. योगेश वायाळ यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.