घोडेगाव आश्रमशाळेत १ मार्चपासून नवीन प्रवेशासाठीची नावनोंदणी
घोडेगाव, ता. २० ः घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत १ मार्च २०२६ पासून नवीन प्रवेशासाठीची नावनोंदणी सुरू होणार आहे. इयत्ता पहिलीच्या वर्गात नवीन प्रवेश घेण्यासाठीची ही प्रक्रिया १५ एप्रिलपर्यंत सुरू असेल, अशी माहिती प्राचार्य चंद्रकांत नाईकडे यांनी दिली.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या चार जिल्ह्यांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी समाजासाठी चालविण्यात येत असलेली ही एकमेव इंग्रजी माध्यम आश्रमशाळा आहे. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ४५ विद्यार्थी संख्या मंजूर असल्याने पालक आपल्या पाल्याची येथे मोठ्या प्रमाणात नावनोंदणी करतात. घटस्फोटीत महिला, विधवा महिला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब यांच्या पाल्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते. नवीन प्रवेशासाठी पाल्याचा किंवा पालकांचा जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, वय ६ वर्षे पूर्ण असल्याचा पुरावा-जन्मदाखला, आधार कार्डाची छायांकित प्रत, विधवा महिलांच्या पतीचा मृत्यू दाखला, घटस्फोटीत महिलांचा आवश्यक पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

