आंबेगावात अवैधरीत्या माती वाहतूक
घोडेगाव, ता. २१ : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पेसा क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये अवैधरीत्या माती वाहतूक आणि उत्खनन जोमात सुरु असल्याने या भागातील जैवविविधता धोक्यात आली आहे. संबंधित वाहने विना नंबर प्लेट वाहतूक करत असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आदिवासी बांधवांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. उत्खनन करणे म्हणजे पेसा कायद्याची पायमल्ली असल्याचे पेसा अभ्यासक सीताराम जोशी यांनी सांगितले. अवैद्य वाहतूक आणि उत्खनन करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करू यासाठी पथके तयार करण्यात येणार असल्याचे प्रभारी तहसीलदार सचिन वाघ यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील चिखली, जांभोरी, पोखरी, तळेघर, भीमाशंकर आदि परिसरातील माती, मुरूम अवैधरित्या आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यामध्ये दिवसा कमी प्रमाणात तर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. या वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांना कोणतीही नंबर प्लेट नसते. ही वाहने खुलेआम रस्त्यावर फिरताना कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याकडून कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा जैव विविधतेसाठी प्रसिद्ध असून त्याचा समावेश इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये करण्यात आला आहे. ग्रामसभेची परवानगी न घेता, संबंधित प्रशासनाला हाताशी धरून या भागातील माती, मरूम उपसा असाच सुरू राहिला तर भविष्यात पर्यावरणाची समस्या निर्माण होऊन मानवी जीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या अवैध माती, मरूम उत्खननाबाबत सजग ग्रामस्थांनी तक्रार केली असता या वाहनांवर कारवाई न होता. माती वाहतूक दोन-तीन दिवस बंद होते. त्यानंतर पुन्हा अवैध माती वाहतूक सुरू होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच जे नागरिक तक्रार करतात त्यांची नावे संबंधित माती माफियांना सांगितली जात असल्याने त्यांना संबंधितांकडून दमदाटी करण्याचे प्रकार घडत आहेत. या माती वाहतूक माफियांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सीताराम जोशी यांनी केली आहे.
तहसील कार्यालयाच्या वतीने पथके तयार करण्यात येणार असून अवैध वाहतूक करताना आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
- सचिन वाघ, प्रभारी तहसीलदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

