घोडेगावात ‘स्टार्टअप बूटकॅम्प’ उपक्रम
घोडेगाव, ता. २२ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेंटर ऑफ इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एंटरप्राइझ आणि घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील बी.डी.काळे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘स्टार्टअप बूटकॅम्प’चे नुकतेच आयोजन केले होते.
या विशेष बूटकॅम्पचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. संजय आर्वीकर हे होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. काळकर यांंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन,इन्क्यूबेशन अँड इंटरप्राईजेसचे संचालक डॉ. देविदास गोल्हार प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले, ‘‘उच्च शिक्षित तरुणांनी स्वतः उद्योग, व्यवसाय, रोजगार शोधला पाहिजे. आपण स्वतः काहीतरी करू शकतो, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.’’
दोन दिवस चाललेल्या या कठोर, सखोल प्रशिक्षण सत्रात वाधवानी फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक नावेद अहमद, डॉ. सिरिल क्रास्टो, डॉ. सचिन पोखरकर, डॉ. महेश भास्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने समस्या ओळखणे, डिझाईन थिंकिंग, आयडिया व्हॅलिडेशन, बिझनेस मॉडेल डेव्हलपमेंट आणि आपली स्टार्टअप संकल्पना गुंतवणूकदारांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक असणारे पिचिंग स्किल्स या विषयांवर तांत्रिक व व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात आले.
या उपक्रमातून निवडल्या जाणाऱ्या उत्कृष्ट संकल्पनांची मार्च २०२६मध्ये होणाऱ्या SPPU स्टार्टअप ऑलिम्पियाडसाठी निवड करण्यात येणार असून, तिथे विद्यार्थ्यांना संभाव्य गुंतवणूकदार व सरकारी अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण
करण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे, सचिव विश्वास काळे, अध्यक्ष ॲड. मुकुंद काळे यांचे सहकार्य लाभले. आयोजनासाठी प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गव्हाळे यांनी मार्गदर्शन केले. बूटकॅम्पचे नियोजन समन्वयक प्रा. तुषार गभाले, प्रा. राजश्री फलके यांनी केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात घोडेगाव, मंचर, जुन्नर, बेल्हे, आळे आदी ठिकाणच्या महाविद्यालयातील एकूण ११० विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. रेश्मा शिंदे यांनी केले. डॉ. चांगुणा कदम यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

