पुणे
पळस्टीका-परांडा बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन
घोडेगाव, ता. २६ : घोडेगाव (ता. आंबेगाव) जवळील पळस्टीका - परांडा येथे ३० लाख रुपयांचा साठवण बंधारा मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन माजी सभापती कैलासबुवा काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक अक्षय काळे, घोडेगाव सरपंच अश्विनी तिटकारे, उपसरपंच स्वप्नील घोडेकर, सदस्य प्रदीप घोडेकर, अमोल काळे, गणेश घोडेकर, उल्हास काळे, सुमीत दिवेकर, सागर काळे, ग्रामस्थ विनोद काळे, चंद्रकांत काळे, गोपीनाथ काळे, माऊली काळे, रवींद्र काळे आदि उपस्थित होते.आंबेगाव तालुक्यात जलसंधारणाला चालना देण्यासाठी पळस्टीका - परांडा येथे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे लघू पाटबंधारे विभाग पुणे यांच्या माध्यमातून हा बंधारा मंजूर झाला आहे.

