कोलतावडे परिसरात  
सागाची अवैध तोड

कोलतावडे परिसरात सागाची अवैध तोड

Published on

घोडेगाव, ता. १२ : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पेसा क्षेत्रातील कोलतावडे (ता. आंबेगाव) येथे २७९ सागवान वृक्षाची विनापरवाना तोड करून अवैध लाकूड वाहतूक केल्याप्रकरणी सुभाष विठ्ठल कोकणे याच्यावर वनगुन्हा नोंद केल्याची माहिती घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी दिली.
वनपरिक्षेत्र घोडेगाव कार्यक्षेत्रात येत असलेल्या कोलतावडे परिसरात ७ जानेवारी रोजी अवैध वृक्षतोड झाल्याची तक्रार आल्यावर ८ जानेवारी रोजी फिरते पथक पुणे, वनपरिक्षेत्र अधिकारी घोडेगाव, अधिनस्त क्षेत्रिय कर्मचारी व तक्रार अर्जदार यांनी घटनास्थळी संयुक्त स्थळपाहणी केली. त्यावेळी सुभाष विठ्ठल कोकणे (वय ४५, रा. महाळुंगे सुपेधर, ता. आंबेगाव), शंकर लोहकरे, चिमा शेळके, दुर्गा शेळके (सर्व रा. कोलतावडे) व विठ्ठल शेळके (रा. भीमाशंकर नगर, आळंदी रोड, धानोरी) यांच्यावर महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियमानुसार निर्बंधित साग प्रजातीच्या २७९ झाडांची तोड करून त्यावरील लाकूड माल विनापासी अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी वनअपराध गुन्हा वनपरीक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पुणे यांनी नोंदविला. यावेळी १७६ नग लाकुडमाल हस्तगत केल्याचे घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी सांगितले.
वृक्षतोड करणे अनिवार्य असल्यास वन विभागाकडे अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर वनविभागाचे पथक प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यावर गरज असल्यास परवानगी देत असल्याचे लिमकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com