घोडेगाव येथील शाळेत नृत्य, नाटिका सादर
घोडेगाव, ता. १६ ः घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन झाले. तसेच बक्षीस वितरण समारंभ आंबेगाव पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची नृत्य व नाटिका सादर केल्या.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना काळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे, माजी उपसरपंच सुनील इंदोरे, माजी सरपंच क्रांती गाढवे, ज्योती घोडेकर, बोरघरचे उपसरपंच राजू घोडे, प्रशांत काळे, माजी मुख्याध्यापक हिराबाई काळे, भरत सोमवंशी, गुलाब कर्डीले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी, उपाध्यक्ष हेमंत काळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका शैला शिंगाडे, शिक्षिका अलका चासकर, ललिता शेळके, नंदा काठे, सुनीता काठे यांनी केले. सूत्रसंचालन राजाराम काथेर यांनी केले.

